बिहारमध्ये कोरोना संपला का? संजय राऊतांचा भाजपाला खोचक सवाल

0
303

मुंबई,दि.२५(पीसीबी) – बिहारमध्ये करोना संपला का?, असा सवाल करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला टोला लगावला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिहारमध्ये कोरोना संपला का? असा सवाल करतानाच लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना बोटावर शाई लावण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती आहे. लालूप्रसाद यादव तुरुंगात असले तरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यांमध्ये आणि देशांत कोरोनाच्या भीतीने अधिवेशन होत नाही. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्याने संसदेचं अधिवेशन गुंडाळलं. मग विधानसभा निवडणूक का घेतली जात आहे? एकदाचं कोरोना नावाचं प्रकरण संपवून टाकलं असं जाहीर करा, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान लोकशाहीची बूज राखली गेली पाहिजे. निवडणुका घेण्यासाठी परिस्थिती योग्य आहे की नाही? याचा विचारही केला जायला हवा होता, असं ते म्हणाले. बिहार निवडणुकीत कृषी आणि कामगार विधेयकाचा काहीही परिणाम होणार नसल्याचं सागंतानाच बिहारमध्ये धर्म आणि जातीच्या आधारावरच मतदान होतं. तिथे क्वचितच गरिबी हा मुद्दा चालतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बिहारमधील जनतेच्या मनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात राग आहे. मात्र तिथे विरोधी पक्ष किती सक्षम आहे, यावर सर्व अवलंबून आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.