‘बिग बॉस १३’ बंद करण्याची प्रेक्षकांची मागणी

0
434

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून प्रसिद्ध असलेला बिग बॉस कार्यक्रम बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरही बिग बॉस १३चा विरोध करण्यात येत आहे. #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss असे हॅशटॅगही ट्रेंड कालपासून ट्रेंड होत आहेत. काहींनीतर बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान याला ट्विटरवर ब्लॉक केल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. बिग बॉसला होणाऱ्या विरोधाच कारण म्हणजे अलीकडेच सुरू झालेला बिग बॉसच्या १३व्या पर्वाची संकल्पना. या पर्वात घरातील सदस्यांना एकमेकांसोबत बेड शेअर करण्यास सांगितले आहे.

सलमान खानने स्पर्धकांना घरात एन्ट्री करण्याच्या आगोदरच सदस्यांचा बीएफएफ म्हणजेच (बेड फ्रेन्ड फोरेव्हर) कोण असेल हे ठरवले होते. बीएफएफच्या संकल्पनेनुसार एकाच बेडवर दोन सदस्यांना झोपायचे आहे. घरातील काही महिला सदस्यांनी पुरुष सदस्यांसोबत बेड शेअर केला आहे आणि प्रेक्षकांना नेमक हेच खटकत आहे. अनेकांनी बिग बॉसच्या संकल्पनेचा कडाडून विरोध केला आहे. तर, काहींना बिग बॉस लव्ह जिहादला खतपाणी घालत असल्याचाही आरोप केला आहे.

भाजप नेता सत्यदेव पचौरी यांनी बिग बॉस विरोधात एक ट्वीट केलं आहे. हे बिग बॉस नाहीये. अस्कृंत लोकांच्या मौजमज्जेचा अड्डा झाला आहे. अशा कार्यक्रमांचा विरोध करून तो बंद करण्याची गरज आहे. मी अजूनपर्यंत एकदाही या कार्यक्रमाचा भाग बघितला नाहीये. पण मला मिळालेल्या माहितीनुसार असे कार्यक्रम समाजात विकृती पसरवतात अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची गरज आहे.