बिग बॉस’ विजेती शिल्पा शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
931

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाची विजेती व मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये आज (मंगळवार) प्रवेश केला.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे  प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर बिग बॉसच्या दहाव्या पर्वात प्रवेश केल्यावर ती अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली होती.  बिग बॉसच्या विजेतेपदामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडली होती.

शिल्पा हिने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकारणात पाऊल ठेवले आहे. त्यामुळे ती निवडणुकांच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर तिच्या लोकप्रियतेचा काँग्रेसला फायदा होणार की नाही, हे लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.