इंदापूरातील रुई गावात विमान कोसळून प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी

0
1046

इंदापूर, दि. ५ (पीसीबी) –  इंदापूर तालुक्यातील रुई गावात विमान कोसळून झालेल्या  दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला.  तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले. रूई येथील श्री बाबीर विद्यालयजवळ आज (मंगळवारी) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बारामतीतील कार्वर अॅव्हिएशनचे   विमान कोसळले.

सिध्दार्थ टायटस असे जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव आहे.

विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ३५०० फुट उंचीवरून हे विमान खाली कोसळले. यात प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला  आहे. स्थानिक नागरिकांनी त्याला खासगी दवाखान्यात नेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी बारामती येथे हलवले.