बलात्कार व हत्या प्रकरणातील बाबा राम रहीम पॅरोलवर बाहेर

0
258

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी असलेला बाबा राम रहीम हा एक दिवसाच्या सिक्रेट पॅरोलवर बाहेर आला. २४ ऑक्टोबरला त्याला हा पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बाबा राम रहीम हा आरोपी एक दिवसासाठी तुरुंगाबाहेर असणार आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरल्यानंतर डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे एक दिवसाचा पॅरोल आईला भेटण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. राम रहीम या दरम्यान फरार होऊ नये म्हणून सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे.