बापरे! माणूस म्हणावं कि सैतान? ‘त्या’ घरात ३०००च्यावर मानवी हाड सापडल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले आणि सोबत भयंकर असं…

0
1685

उत्तर अमेरिका, दि.१४ (पीसीबी) : उत्तर अमेरिकेतील मॅक्सिकोमध्ये एका नरभक्षक व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तेव्हा तेथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण दरम्यान समोर आलेल्या माहितीने सगळ्यांचे धाबे दणाणलेत. एका आरोपीच्या घरात झालेल्या तपासणीत चक्क ३,७८७ मानवी हाडे सापडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. हा नरभक्षक सिरीयल किलर पेशाने कसाई म्हणून काम करायचा आणि संधी मिळताच लोकांना ठार मारायचा. ‘द सन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नरभक्षक मारेकरीचे नाव अँड्रेस असून तो पेशाने कसाई होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संधी मिळताच लोकांना आपले बळी बनवायचे. सीरियल किलरच्या घरी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने सुमारे २० बेपत्ता लोकांचे अवशेष शोधून काढत हजारो हाडे मिळवल्याचा दावा केला आहे.

नरभक्षक अँड्रेस यांच्या घरात ही हाडे कॉंक्रीटच्या फरशीखाली सापडली. यासाठी मृतदेहांचे अगदी लहान तुकडे केले गेले असल्याचे . फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी सांगितले. अँड्रेस राहत असलेल्या अपार्टमेंट मध्ये पोलीस आणखी खोदकाम करणार आहे. आरोपीच्या घरातून गायब झालेल्या लोकांची ओळखपत्रे, कपडे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यामुळे हे स्पष्ट झाले की आरोपी बराच काळापासून अशा प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपी मारेकरी पकडला गेला कारण त्याने पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचालाच शिकार केले. त्यांना तो वैयक्तिक ओळखत होता. पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आरोपी सीरियल किलर अँड्रेसबरोबर शॉपिंग ट्रिपवर गेली होती आणि त्याच दिवशी ती गायब झाली. पत्नी परत आली नसल्यामुळे तिच्या पतीला आरोपीवर संशय आला.

दरम्यान गुन्हा सिद्ध होताच आरोपीने नाटक करायला सुरुवात केली. पोलिसांनी पुराव्यासोबत न्यायालयात हजर केले असता एका महिलेला सुंदर दिसत असल्यामुळे मारले असल्याचे त्याने सांगितलं. ४ तास चाललेल्या सुनावणी दरम्यान आरोपीने आजारी असल्याचे नाटक केले.