बहिणाबाई शब्दांत यातना होण्यासारखे काय? शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

0
496

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  धनंजय मुंडे  पंकजांना बहिणाबाई बोलल्याचे मी ऐकले आहे. त्यात वावगे असे काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखे  काय आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.   धनंजय यांनी  सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  या पार्श्वभूमीवर पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले की,  धनंजय  पंकजांना ‘बहिणाबाई’ म्हणाले, असे खुद्द मी त्यांच्या भाषणातच ऐकले आहे. खरेतर या शब्दात यातना होण्यासारखे काहीच नाही. उलट हा शब्द आदरणीय आहे. ‘बहिणाबाई’ या महाराष्ट्रातील मोठ्या कवी होत्या. त्यांच्या कविता घोकतच आम्ही मोठे झालो. त्यामुळे धनंजय मुंडे  पंकजांना बहिणाबाई म्हणाले असतील, तर त्यात मला आक्षेप घेण्यासारखे किंवा गंभीर काहीच वाटत नाही.