पिंपरीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत राडा, दोघांना केले खासगी रूग्णालयात दाखल

0
3007

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) सकाळी राष्ट्रवादीचे माजी महापौर व नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या घरासमोर घडली. यामध्ये शिवसेनेचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या घरासमोर कार्यकर्ते मतदान स्लिपा वाटपाचे काम करत होते. त्यावेळी ३० ते ४० जणांनी मिळून आसवानी यांच्या घरासमोर थांबलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यामध्ये आसवानी व त्यांच्या भावाला आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. असे आसवानी यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी प्रतिहल्ला केला असता, शिवसेनेचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

दरम्यान, घटनेनेनंतर आसवाणी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसून अधिक तपास सुरू आहे. असे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर बाबर यांनी सांगितले.