बलात्कार प्रकरणी वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या आरोपी विरोधात आखेर गुन्हा

0
1430

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – वायसीएम रुग्णालयात बालात्कार प्रकरणी उपचार घेत असलेल्या त्या अल्पवयीन मुलीच्या आरोपी विरोधात आखेर पिंपरी पोलिसांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शाम शिंगाडे (रा. वचपे, ता. आंबेगाव, जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून वायसीएम रुग्णालयात आंबेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी गरोधर असल्याने उपचार घेत होती. मात्र तिने मृत बाळाला जन्म दिला. त्या बाळाची विल्लेवाट तिच्या घरच्यांनी परस्पर लावली. तसेच तिच्यावर झालेल्या बलात्कार प्रकरणी तिने किंवा तिच्या घरच्यांनी पोलीसात तक्रार देखील दाखल केली नव्हती. या दरम्यान पिंपरी-चिंचवड वूमन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीला याबाबत माहिती मिळाली त्यांनी पीडित तरुणी आणि तिच्या घरच्यांना पोलीसात तक्रार देण्यासाठी सांगितले. मात्र घाबरलेल्या कुटूंबाने तक्रार देण्यास नकार दिला.

यामुळे या समितीतील महिलांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पाटील यांनी घोडेगाव पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर घोडेगाव पोलिसांनी वायसीएममध्ये जाऊन पीडितेच्या कुटूंबीयांना आणि पीडितेला समजावले मात्र तरी सुध्दा भेदरलेल्या कुटूंबीयांनी तक्रार देण्यास साफ नकार दिली. यावर पिंपरी पोलिसांनी याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घोडेगाव पोलीस तपास करत आहेत.