वानवडीच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये लष्कराचा गणवेश घालून फिरणारा संशयित ताब्यात

0
700

पुणे, दि. २५ (पीसीबी) – लष्कराचा गणवेश घालून वानवडीच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये फिरणाऱ्या एका संशयित तरुणाला वानवडी पोलिसांनी सोमवारी (दि.२४) रात्री नऊच्या सुमारास ताब्यात घेतले. या तरुणाकडे एक बनावट ओळखपत्र आढळून आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडीच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये एक तरुण लष्कराच्या गणवेशात फिरताना आढळून आला. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आणि कमांड हॉस्पिटल लष्कराच्या हद्दीत येतो. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी कमांड हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. याच भागात एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना दिसला. या तरुणाला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे लष्कराचा गणवेश आणि बोगस ओळखपत्र आढळून आले. या तरुणाची वानवडी पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.