बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पण…

0
204

तळवडे, दि. २९ (पीसीबी) – तळवडे येथे असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 28) रात्री दीड ते सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडली.

अरविंद मुकुंदराव वायकुळे (वय 58, रा. बावधन खुर्द, पुणे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे मधील गणेशनगर येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्री दीड ते सव्वा दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे एटीएम सेंटरमध्ये गेले. एटीएमचा डिस्प्ले युनिट व कॅश डोअरचे नुकसान करून एसएनजी लाॅकचे नुकसान केले. तसेच मशीनमधून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.