अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
233

चाकण, दि. २९ (पीसीबी) – आळंदी चाकण या मार्गावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 12 जून रोजी रात्री कडाचीवाडी येथे आळंदी घाटात घडला.

अण्णासाहेब शिवाजी घोरपडे (वय 44, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राकेश तानाजी घोरपडे (वय 32, रा. वडगाव रोड, आळंदी) यांनी सोमवारी (दि. 28) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार चाकी वाहनावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास मयत अण्णासाहेब घोरपडे आळंदी चाकण या मार्गावरून दुचाकीवरून जात होते. ते कडाचीवाडी गावाच्या हद्दीत आळंदी घाटात आले असता एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अण्णासाहेब यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.