फडणवीस यांच्या ट्वीटची पवारांनी उडवली खिल्ली

0
176

जळगाव, दि. १५ (पीसीबी) – देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आरोप केले त्याचा फक्त मी एंजॉय करतोय, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक शब्दांत भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिले.जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनवी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट मी पाहिले, त्यांचा मी आनंद घेतो. मला काही समजत नाही, त्यांनी जातीवादाचा आरोप केला, त्याबद्दल काही समजत नाही. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळी पहिल्या राज्याचे नेतृत्व हे छगन भुजबळ हे होते. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये मधुकर पिचड होते. त्यानंतर प्रवीण गुजराती होते, तटकरे होते. समाजातील प्रत्येक घटकांना घेऊन जाणारी माणसं होती. पक्षाची नीती एका जातीला धरून नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेला मी महत्त्व देत नाही, असं पवार म्हणाले. ‘मनसेबद्दल मला काही सांगता येत नाही, आतापर्यंत त्यांनी काही केले, याचे काही झाले नाही. पण एक काळजी वाटते सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ नये, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.

‘ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, अशा दोन राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काही करून पर्यंत करत आहे. यासाठी ईडीचा वापर करत आहे. त्यामुळे ईडीचे छापेमारी सुरू आहे. कायद्यानुसार आणि नियमानुसार कारवाई करण्याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री निर्णय घेतली, असंही पवार म्हणाले.