सांगवीत किरकोळ कारणावरून मित्राच्या भावावर खुनी हल्ला

0
238

सांगवी, दि. १५ (पीसीबी) – ओळखीचा मित्र तरुणाला ‘तुला मोठेपणा करण्याची हाऊस आहे’ असे म्हणाला. हा प्रकार तरुणाने मित्राच्या घरच्यांना सांगितला. त्यावरून मित्राने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तरुणाला आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 13) वैदवस्ती पिंपळे गुरव येथे घडली.

निखिल अंबादास पडळकर (वय 20, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल लोखंडे, विशाल लोखंडे, युवराज लोखंडे, किशोर लोखंडे (सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा मित्र विशाल याने फिर्यादीसोबत बोलताना ‘तुझं काय सांगतो. तू इथे भाड्याने राहतो. तुला मोठेपणा करण्याची हाऊस आहे’ असे म्हटले. याबाबत फिर्यादी यांनी विशालच्या वडिलांना सांगितला. त्यावर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. फिर्यादीच्या भावाच्या पायावर, डोक्यावर चाकूने वार केले. आरोपी युवराज याने फिर्यादीच्या भावाच्या डोक्यात विटांनी मारले. तर आरोपी किशोर याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाला दगडाने मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.