फक्त कर्करोगालाचं नाही तर इतर शारीरिक त्रासावर सुद्धा ‘हे’ फळ आहे जालीम उपाय; फायदे वाचून तुम्ही ‘ही’ कराल सेवन

0
528

ड्रॅगन फ्रुट’ हे दिसायला जरी आकर्षक असले तरी त्याचे नाव हे अंगावर काटा आणते. परंतु ड्रॅगन प्राण्याशी ‘ड्रॅगन फ्रुट’चा काहीही संबंध नाहीये. या ‘ड्रॅगन फ्रुट’ मध्ये ‘प्रोटिन’चे प्रमाण जास्त असते, त्यामुळे या फळाच्या सेवनाने आपण अनेक आजारांना आपल्यापासून लांब ठेवू शकतो. हे फळ शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. याशिवाय आपल्या शरीरातील ‘कोलेस्ट्रॉल’ नियंत्रित ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते.

‘ड्रॅगन फ्रूट’ हे मेक्सिको आणि अमेरिका येथील आहे. याशिवाय थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल व श्रीलंका या देशात त्याला जास्त मागणी असते. हे फळ एक निवडुंग प्रकारातील वेल असून त्याचा रंग हा वरून लाल आणि आतील गर पांढरा असतो. ड्रॅगन फ्रुट तीन प्रकारात मोडते. या फळाचा वापर सौंदर्यप्रसाधनातही मोठय़ा प्रमाणावर केला जातो. फेसमास्क, केसमास्क साठी याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर असतं.

या फळामध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण अधिक असते. या फळाचा उपयोग हा फळ पित्तनाशक असल्याने आशियाई देशात याला ‘पिताया’ या नावानेही ओळखले जाते. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ‘व्हिटॅमिन बी’चे प्रमाण या फळात मोठय़ा प्रमाणावर असते. शिवाय, हे फळ चवीला आंबट असले तरी संधीवाताच्या वेदना कमी करण्यास महत्वाचे काम करते. तसेच हाडे व दात मजबूत होतात. कर्करोगावर जालीम उपाय करणारेही हे फळ असल्याचे सांगितले जाते. या फळात असलेली कर्बोदके आतडय़ांना निरोगी ठेवण्यास मदत करते. या फळाच्या सेवनाने मेंदूचे आरोग्यसुद्धा चांगले राहते. शिवाय मानवी शरीरातील तणाव कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हे फळ मधुमेहासोबत रक्तदाब व ह्रदयविकार रुग्णांसाठी हेफळ वरदान आहे. त्यातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट पेशी सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

(या लेखातून फक्त सर्वसामान्य माहिती देण्यात अली आहे. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला घेऊनच करणे आवश्यक आहे.)