प्रिया मलिकने जिंकले सुवर्णपदक

0
243

हंगेरी, दि. 25 (पीसीबी) : हंगेरी येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चँपियनशिपमध्ये भारताने मोठे यश संपादन केले आहे. भारताची महिला खेळाडू प्रिया मलिक हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव करून जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.

प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक, 2019 मध्ये दिल्लीत 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2020 मध्ये पटना येथे राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. प्रिया मलिकने सन 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्कूल गेम्समध्येही सुवर्ण जिंकले आहे.

मीराबाई चानूने शनिवारीच टोकियो ऑलिम्पिक -2020 मध्ये देशासाठी रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर प्रिया मलिकनेही आपली कामगिरी दाखवत देशाची मान वाढवला आहे. प्रियाच्या या यशाबद्दल ट्विटरवरून लोक तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत प्रिया चौधरी ही भरतसिंग मेमोरियल स्पोर्ट्स स्कूल निडानीची खेळाडू आहे.