प्रिया दत्त ७१, ऊर्मिला मातोंडकर ६८ कोटींच्या संपत्तीची मालकीण

0
474

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मुंबईतील अनेक उमेदवारांनी लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेसच्या प्रिया दत्त, ऊर्मिला मातोंडकर, संजय निरुपम आणि एकनाथ गायकवाड यांनी, तर शिवसेनेच्या राहुल शेवाळे, अरविंद सावंत आणि भाजपच्या मनोज कोटक यांनी आपले उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनात दाखल केले.

उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्याकडे एकूण ७१ कोटींची, तर ऊर्मिला मातोंडकर यांच्याकडे ६८ कोटींची संपत्ती आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे ३९ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी डॉ. अनिलकुमार, बीआरएसपी योगेश मोरे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.