पंतप्रधान मोदींचे कपडे फाडून संधीचे सोनं करा – प्रकाश आंबेडकर

0
552

बुलढाणा, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे, तशी राजकीय नेत्यांची एकमेकांवरील टीकेची धारही वाढल्याची दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचे कपडे फाडून संधीचे सोनं करा, त्यांना सत्तेतून खाली खेचा, असे त्यांनी म्हटले आहे.

आज (मंगळवार)  बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला.

मोदींनी नोटबंदी करुन व्यापाऱ्यांना लुटले. त्यामुळे व्यापार बुडला, असा आरोप करून मोदींना सत्तेतून खाली खेचा, असे आव्हान आंबेडकर यांनी  केले.  मोदींनी नोटबंदी कशी केली? हा अधिकार मोदींना कोणी दिला? कारण नोटांवर जर गव्हर्नरची सही आहे, तर नोटांची सर्व मालकीही गव्हर्नरची असायला हवी. कोणत्याही नोटा बदलून देण्याचे काम हे त्यांचेच आहे. मग मोदी कशी काय नोटबंदी करू शकतात? असे सवाल  त्यांनी  केला.