मराठा आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकाला एस.टी महामंडळात नोकरी; रावतेंची घोषणा    

0
412

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान राज्यभरातील ४२  मराठा बांधवांनी आत्महत्या करत बलिदान दिले होते. या आंदोलनातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांपैकी एका सदस्याला एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (शनिवार) केली.