प्रियांका गांधी, शरद पवारांच्या उपस्थितीत ११ ऑगस्ट रोजी पंढरपुरात धनगर आरक्षण महामेळावा

0
542

पंढरपूर, दि. २७ (पीसीबी) – पंढरपूरमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या उपस्थितीत ११ ऑगस्ट रोजी धनगर आरक्षण महामेळावा होणार आहे.  आघाडीकडे असलेल्या धनगर नेत्यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेऊन दोन लाख समाजाच्या उपस्थितीत  हा महामेळावा घेण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसमधील धनगर समाजाचे आमदार रामहरी रुपनवर आणि राष्ट्रवादीचे  अण्णा डांगे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.  धनगर समाजाला संविधानात दिल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास फडणवीस सरकार विलंब करीत असल्याने त्यांच्यावरील नाराजी प्रकट करण्यासाठी हा मेळावा घेतल्याचे आमदार  रुपनवर यांनी सांगितले.

या मेळाव्यास सर्व धनगर संघटना उपस्थित राहणार असल्याचा दावा करताना या मेळाव्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच ९ ऑगस्ट पासून धनगर आरक्षण समन्वय समिती पंढरपूर मध्ये ५ लाख समाज बांधवांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरु करणार आहे.