प्राधिकरणात स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा दिमाखात

0
61

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – प्राधिकऱणातील श्री स्वामी समर्थ भक्त सेवा संघाच्या वतीने प्रकटदिनाचे निमित्ताने गेले नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. खगेंद्र दादा बुवा यांच्या श्रीराम कथा सप्ताहाला रोज हजारो भक्तांनी हजेरी लावली. बुधवारी प्रगट दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

स्वामी समर्थ प्रतिष्ठान, नवचैतन्य भजनी मंडळ, गायत्री भजनी मंडळ, वैदेही भजनी मंडळ, स्वर शारदा भजनी मंडळ, चैत्राली भजनी मंडळ, मिरा भजनी मंडळ, सरस्वती भजनी मंडळ, भक्ती सुधा भजनी मंडळाच्या महिलांनी रोजची भजन सेवा केली.
प्रगटदिनाला सकाळी आरती करण्यात आली. नंतर रुद्राभिषेक पार पडला. दुपारी मध्यान्ह महाआरती आणि नंतर महाप्रसाद झाला. परिसरातील हजारो भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला.

मंदिराचे प्रमुख विश्वस्त आप्पा डेरे यांच्यासह कार्याध्यक्ष सुहास देशमुख, उपाध्यक्षा मिनलताई डेरे, सचिव शामराव बरिदे, खजिनदार बाळकृष्ण करंदीकर तसेच सोहळा समितीचे हर्षल रुपारेल, सुभाष राठोड, शिंगरे बंधु, दिलीप गोसावी, प्रतिमा डेरे, वामन भट, देविदास वंजारी, सुरेश कोळेकर, संजय निंबाळकर, सचिन जोशी, हेमंत कुलकर्णी, हरिभाऊ सोनवणे उत्सव समितीचे तेजस डेरे, दीपक डेरे, वैभव बरिदे, अभिराज कावूर, आनंद यरगोळे, शैलेष शेट्टी, अभिषेक शेट्टी, निलेश भट, आदित्य नहार, सिध्दांत देशमुख, निमेष राठोड, पियुष नहार, मनोज हेगडे, स्मामी प्रतिष्ठान, श्रीनिवास विहार मित्र मंडळ यांनी सोहळ्याचे नियोजन केले होते.