प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन

0
335

पुणे, दि. २८ (पीसीबी) – प्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचे निधन झाले आहे. त्या ५१ वर्षाच्या होत्या. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलान्यूमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या.