तारिक अन्वर यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी  

0
988

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघामधून  खासदार म्हणून निवडणून आलेले तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या खासदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, राफेल विमान खरेदी व्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संबंध नाही. मात्र, याची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी होण्यास काही हरकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. तर राफेल मुद्द्यावर काँग्रेसकडून मोदींची चोर अशी संभावना केली होती. तर विरोधकांनी ही मोदींना घेरण्याची तयारी सुरू केली होती. त्यातच पवारांनी मोदींची पाठराखण केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

   दरम्यान, तारिक अन्वर यांनी पक्ष का सोडला? याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.  पवार यांनी राफेल प्रकरणी विरोधकांवर टीका केली होती. तसेच पंतप्रधानांची पाठराखण केल्याचा त्यांच्यावर आरोप  केला जात आहे.  पवार यांच्या याच भूमिकेमुळे तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.