प्रसारमाध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो; मनमोहनसिंगांचा मोदींना टोला

0
684

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – प्रसारमाध्यमांना घाबरणारा पंतप्रधान कधीच नव्हतो. प्रत्येक विदेश यात्रेनंतर, निर्णयानंतर मी पत्रकार परिषद घेत होतो, असा टोला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

मनमोहन सिंग यांच्या ‘चेंजिंग इंडिया’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक सिंग यांनी सहा खंडांत लिहिले आहे. त्याच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दल बोलताना सिंग म्हणाले की,  मी कायम पत्रकार परिषदा घ्यायचो. माझ्या धोरणांबद्दल माध्यमांशी संवादही साधायचो, असे ते म्हणाले. मी अपघाताने पंतप्रधानच नाही,  तर अपघाताने अर्थमंत्रीही झालो होतो, असा खुलासा सिंग यांनी यावेळी केला.

१९९१मध्ये सिंग युजीसीमध्ये कार्यरत होते. अचानक एकदिवशी त्यांना पंतप्रधान नरसिंह राव यांचा फोन आला. तुम्हाला  तातडीने अर्थमंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असा आदेश त्यांना  मला दिला. आणि एका दिवसाच्या आत अर्थमंत्री झालो, असे सिंग यांनी सांगितले.