प्रवीणने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या?, हे सांगायला लावू नका – जितेंद्र आव्हाड   

0
3279

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – प्रवीण महाजनने प्रमोद महाजन यांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला.

प्रमोद महाजन आणि पवारसाहेब यांचे मैत्रीचे संबध होते. याची तरी आपल्याला आठवण यायला हवी होती, हे पण आपण विसरलात का? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण पवार साहेबांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो. आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार, अशा शब्दांत आव्हाड यांनी महाजन यांना खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, तुम्ही दाखवत असाल की, सगळ्यांचे ऐकत आहात. मात्र, शकुनी मामासारखे सगळ्या ठिकाणी नाक लावून  महाभारत सुरु केले, असे आपण शरद पवार आहात. अशी महागठबंधनची गोष्ट आहे. बघितले ना, शकुनी मामा कसा असतो? स्वत:ला मिळाले नाही ना, तर इकडचे तिकडे आणि तकडचे इकडे. मंथरा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत. असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या होत्या.