प्रतिबंधित गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणी दोघांना अटक

0
322

चाकण, दि. ७ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा दोघांनी त्यांच्या दुकानात साठवून ठेवला. तसेच गुटख्याची विक्री केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 97 हजार 324 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

बाबुलाल भानाराम चौधरी (वय 30, रा. चाकण, ता. खेड. मूळ रा. राजस्थान), विकास आंबादास सोळुंके (वय 23, रा. कडाचीवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना गुटखा पुरवणा-या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबुलाल आणि विकास यांचे घाडगे मळा येथे आई माताजी सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी किराणा दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवणूक करून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने दुकानात छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये 97 हजार 342 रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.