ओटास्कीम मधून दीड लाखांचा गांजा जप्त; महिलेस अटक

0
213

निगडी, दि. ७ (पीसीबी) – गांजा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने ओटास्कीम, निगडी येथे कारवाई करत एका महिलेला अटक केली. तिच्याकडन सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 6) दुपारी दोन वाजता ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 26 वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिला विक्रीसाठी गांजा पुरवणारा आबा पवार (वय 40, रा. ओटास्कीम, निगडी. मूळ रा. जामखेड, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने ओटास्कीम येथे गांजा विक्री केली. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. गुरुवारी दुपारी सामाजिक सुरक्षा विभागाने ओटास्कीम येथे छापा मारून कारवाई केली. त्यात आरोपी महिला अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विकताना आढळून आली. तिच्याकडून एक लाख 46 हजार 750 रुपये किमतीचा पाच किलो 870 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी आबा पवार याने आरोपी महिलेला विक्रीसाठी गांजा उपलब्ध करून दिला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.