ओएलएक्स वरील सोफा खरेदी करण्याच्या बहाण्याने घातला 84 हजारांचा गंडा

0
275

वाकड, दि. ७ (पीसीबी) – ओएलएक्सवर सोफा विक्रीची जाहिरात दिलेल्या व्यक्तीला दोन क्रमांकावरून फोन आले. फोनवरील व्यक्तींनी क्यू आर कोड स्कॅन करायला लावून आणि त्यानंतर अशा दोन टप्प्यात 84 हजार रुपये बँक खात्यातून काढून घेत फसवणूक केली. ही घटना 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत वाकड रोड, वाकड येथे घडली.

प्रणव सुधाकर मुळे (वय 41, रा. वाकड रोड, वाकड) यांनी गुरुवारी (दि. 6) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुळे यांनी त्यांच्या घरातील सोफासेट ओएलएक्स सेलिंग पोर्टलवर विकण्यासाठी 30 डिसेंबर रोजी जाहिरात दिली. त्यानंतर मुळे यांना 7236975405, 9569165480 या क्रमांकावरुन फोन आले. सोफा विकत घेतो, असे सांगून फोनवरील व्यक्तीने पैसे पाठवल्याचा बहाणा करुन मुळे यांना क्यू आर कोड स्कॅन करायला लावला. त्याद्वारे मुळे यांची 45 हजारांची फसवणूक केली. त्यांनतर आरोपींनी मुळे यांच्या क्रेडिट कार्डमधून 39 हजार 504 रुपये काढून घेत त्यांची एकूण 84 हजार 504 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.