पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने अशी केली वृद्धाची फसवणूक

0
217

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – एटीएम मधून पैसे काढून बाहेर आल्यावर पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका वृद्धाला फसवले. पैसे मोजताना हातचलाखी करून वृद्धाचे लक्ष विचलित करून 39 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) दुपारी दीड वाजता तळेगाव दाभाडे येथील एसबीआय बँकेच्या एटीएम समोर घडली.

उत्तम महादेव पाटील (वय 62, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. सांगली) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचे संभाजी नगर, तळेगाव दाभाडे येथे किराणा मालाचे दुकान आहे. पाटील गुरुवारी दुपारी दीड वाजता शांताई सिटी येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये आले. त्यांनी एटीएम मधून पैसे काढले आणि एटीएम सेंटरच्या बाहेर आले.

एटीएम सेंटरच्या बाहेर थांबलेल्या दोन जणांनी पाटील यांना त्यांचे पैसे मोजून देण्याचा बहाणा करून त्यांचे पैसे घेतले. हातचलाखी करून पाटील यांचे लक्ष विचलित करून आरोपींनी 39 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.