सावधान! बांधकाम साईटवरती आता चोरट्यांची नजर…

0
196

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) – जांबे येथील एका बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 11 हजार 832 रुपयांचे स्टील आणि बाइंडिंग वायर चोरून नेल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) सकाळी अकरा वाजता उघडकीस आला. सागर शिवाजी पाटील (वय 30, रा. जांबे. ता. मुळशी. मूळ रा. नाशिक) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबे गावात शिवाजी बुचडे यांच्या जागेत बांधकाम सुरु आहे. त्या बांधकाम साईटवरून बुधवारी रात्री साडेसात ते गुरुवारी सकाळी अकरा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एक लाख 11 हजार 832 रुपयांचे स्टील आणि बाइंडिंग वायर चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.