पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना चाकणमध्ये अटक  

0
1306

चाकण, दि. २४ (पीसीबी) – कागदपत्रांची मागणी करून ५ हजार रूपये न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी धमकी देणाऱ्या तिघांना शुक्रवारी (दि. २३ ) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी शैला कैलास  वालकोळी (वय २१, रा. रानुबाई माळ, संजिवनी हॉस्पीटलसमोर चाकण ) यांनी चाकण पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.

त्यानुसार  समीर राजाराम वाघोले (वय २५ रा. रानमळा, कडूस ता.खेड) सागर अरूण मांडे (वय २७ रा. महात्मा चौक चाकण ) निखील बबन भोसले (वय २५ रा. गेलेगाव, ता.खेड) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र मंगेश रोडचे शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास राणुबाई मळा ते सहारा सिटी रोडवरील  एचपी चौकात बोलत उभे होते. त्यावेळी तेथे येऊन तिघा आरोपींनी त्याच्याकडे कागद पत्रांची मागणी करत ५ हजारांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.