पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण; चौघांना अटक

0
1264

थेरगाव, दि. २४ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणास मारहाण करून जबर जखमी करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली. ही घटना थेरगाव येथे शनिवारी (दि. 22) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.

नारायण शेट्टीबा धोत्रे (वय 57), तुषार नारायण धोत्रे (वय 25, दोघेही रा. जय मल्हार नगर, थेरगाव), प्रकाश गौतम भवार (वय 30, रा. रिव्हर रोड, पिंपरी) आणि अमृत विजय वीटकर (वय 28, रा. आदर्शनगर, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अल्लादीन दस्तगीर पटेल (वय 31, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी रविवारी (दि. 23) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्लादीन यांचा भाऊ मेहबुब पटेल यास शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून जुन्या भांडणाच्या कारणावरून पाइप, लाकडी काठी तसेच लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.