….. म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली तब्बल ३४५ जणांवर कारवाई

0
534

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) कोरोना बाधितांची संख्या हळुहळू कमी होताना दिसत आहे. मात्र नागरिकांसाठी सरकारने लागू केलेली बंधने अद्यापही कायम आहेत. वीकेंडच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२३) शहरात विनामास्क फिरणाऱ्या ३५४ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्‍वास सोडलेला आहे. मात्र हे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापरा करावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले जात आहे. वारंवार हात धुवा, सोशल डिस्टंन्सिगचे पालन करा आणि मास्कचा वापर करा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

रविवारी पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (50), भोसरी (18), पिंपरी (16), चिंचवड (56), निगडी (8), आळंदी (4), चाकण (5), दिघी (13), सांगवी (24), वाकड (10) हिंजवडी (57), देहूरोड (38), चिखली (22), तळेगाव (00), तळेगाव एमआयडीसी (09), रावेत चौकी (11), शिरगाव चौकी (13), म्हाळुंगे चौकी (00) या पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी रविवारी 354 जणांवर कारवाई केली.