‘….आणि मोबाइल एका क्षणात गायब झाला’

0
300

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फोनवर बोलत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा सात हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन हिसकावला. ही घटना भोसरी येथील लोंढे उद्यानासमोर गुरुवारी (दि. 20) साडेदहाच्या सुमारास घडली.

उत्तम नारायण कर्डिले (वय 60, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी साडेदहाच्या सुमारास भोसरी येथील लोंढे उद्यानासमोर भोसरी -लांडेवाडी रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने फिर्यादी यांच्या हातातील मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.