पूरग्रस्तांना मदत करतानाचे फुटेज एडिट करुन गैरवापर; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजनांची पाठराखण

0
515

सांगली, दि. १० (पीसीबी) – पूरस्थिती इतकी भीषण होती की तिथे जाणे कुणालाही शक्य नव्हते. अशाही परिस्थितीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यांनी कोणताही सेल्फी घेतला नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महाजन यांची पाठराखण केली.

मुख्यमंत्र्यांनी  आज ( शनिवारी)  सांगलीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.  त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त भागात केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगलीत यावर्षी विक्रमी पाऊस झाला आहे. पूरस्थिती इतकी भीषण होती की  गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यांनी कोणताही सेल्फी घेतला नाही. बोटीमधून सोडायला येणाऱ्यांना त्यांनी हात दिला होता. ते फुटेज एडिट करुन गैरवापर करण्यात आला,  असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला  दिले.