पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, यावर मला शंका – फारुख अब्दुल्ला

0
691

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. मात्र, मला शंका आहे की खरंच पुलवाला हल्ल्यात ४० जवान शहीद झाले का? असे संतापजनक विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. यामुळे  मोठा वाद निर्माण झाला असून अब्दुल्ला अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार सर्व बाजूने अपयशी ठरले आहेत, अनेक खासदारांचे तसेच  मत आहे. तसेच मोदी सरकारकडे साडेचार वर्षात काय काम केले, हे दाखवण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे मुळ मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार युद्ध सदृष परिस्थिती निर्माण करत आहे, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला.

पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला करुन आम्ही ३०० दहशतवादी मारल्याचे सांगितले जात आहे. काहीजण ५०० दहशतवादी मारले गेल्याचा दावा करत आहेत. मात्र आम्ही किती धाडसी आहोत, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.  यासाठी ते काहीही करु शकतात, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.