गहुंजेत वृध्देच्या घरात शिरलेल्या चोरट्याला नागरिकांनी दिला चोप

0
571

तळेगाव, दि. ३१ (पीसीबी) – वृध्दा महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत दोन चोरटे तिच्या घरात शिरले तसेच तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओड करताच गावातील नागरिक जमा झाले. त्यांनी एका चोरट्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा चोरटा पळुन जाण्यात यशस्वी झाला. ही घटना शनिवारी (दि.३०) दुपारी २ च्या सुमारास गहुंजे येथील विठ्ठल मंदीरासमोरील भक्ती निवास या घरात घडली.

याप्रकरणी सुमन निर्गुन बोडके (वय ६०, रा. भक्ती निवास, गहुंजे, ता. मावळ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चोरटा अक्षय बबन यादव आणि त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृध्द महिला सुमन बोडके या त्यांच्या घरी एकट्याच असता. ही बाब आरोपी अक्षय आणि त्याच्या साथीदाराला माहिती होती. यावर शनिवारी दुपारी २ च्या सुमारास दोघे आरोपी सुमन यांच्या घरात शिरले. आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्ती हिसकावून चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमन यांनी आरडाओरड  करताच गावातील नागरिक जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करत अक्षय याला पकडले आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र अक्षय याचा दुसरा साथीदार फरार होण्यात यशवी झाला. पोलीस उपनिरीक्षक बाजगिरे अधिक तपास करत आहेत.