पंजाबमध्ये महिला आरोग्य अधिकाऱ्याचा गोळ्या घालून खून

0
600

खरड, दि. ३१ (पीसीबी) – पंजाबच्या खरड भागात शुक्रवारी (दि.२९) वरिष्ठ महिला आरोग्य अधिकारी डॉ. नेहा शौरी त्यांच्या कार्यालयात घुसून एका हल्लेखोराने त्यांच्यावर तब्बल तीन गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर या हल्लेखोराने स्वतःवरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

बलविंदर सिंह (रा. मोरिंडा) असे आरोपी हल्लेखोराचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजणक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा शौरी यांची खरडमध्ये अन्न प्रयोगशाळेत नियुक्ती होती. त्याचबरोबर त्यांच्यावर मोहाली येथील रोपड जिल्ह्यासाठी अन्न व प्रशासन विभागाचा परवाना देण्याची जबाबदारी होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मोरिंडाचा रहिवासी असलेला आरोपी बलविंदर सिंह डॉ. नेहा शौरी यांच्या कार्यालयात घुसला आणि आपल्या परवानाधारी बंदुकीतून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये डॉ. नेहा यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वता:वर ही गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती सध्या चिंताजणक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी बलविंदर हा मोरिंडामध्ये एका औषधाचे दुकान चालवत होता दरम्यान, २००९ मध्ये नेहा यांनी त्याच्या दुकानावर छापा मारला होता तसेच या दुकानातून बंदी असलेली नशेची औषधे जप्त केली होती. त्यानंतर या दुकानाचा औषध परवाना रद्द करण्यात आला होता. परवाना रद्द करण्यात आल्यानेच हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंजाब पोलीस अधिक तपास करत आहेत.