पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना चिखलीत श्रद्धांजली

0
661

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – चिखली, घरकुलजवळ चेरिज कॉर्नर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

श्रद्धांजलीनंतर भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तान मुर्दाबादचाही नारा देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस ऋतिक चव्हाण, मंडल अध्यक्ष ओंकार मोरे, मंडल चिटणीस दीपक गुप्ता व मंडल कार्याध्यक्ष महेश ढवळे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.