पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे ‘भीक मांगो’ आंदोलन

0
805

पुणे, दि. १७ (पीसीबी) – शाळांनी मदतीसाठी कटोरा घेऊन सरकारकडे येऊ नये, त्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागावी, असे विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.  

जावडेकरांच्या या विधानाविरोधात आज (सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसने भीक मांगो आंदोलन केले. यावेळी जमा झालेली रक्कम जावडेकरांना पुण्यात आल्यावर देण्यात येणार आहे. तसेच जावडेकर पुण्यात येतील त्यावेळी त्यांच्या समोर हे भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे,  असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. तर दुसरीकडे मनसेनेही जावडेकरांच्या विधानाविरोधात  फलक  लावून निषेध केला आहे.

शाळांनी भीकेचा कटोरा घेऊन नेहमी सरकारकडे येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत मागावी, असे जावडेकर म्हणाले होते. जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात?  माजी विद्यार्थी. नामांकित विश्वविद्यापीठे कोणामुळे चालतात? माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी आपापल्या शाळेला मदत केली आहे, असे जावडेकर म्हणाले होते.