पुण्यातील आज ३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू, संसर्ग झालेल्यांचा आकडा ११३९ वर

0
280

 

पुणे, दि.२७ (पीसीबी) – पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढ असतानाचं आज ३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात या तिघांवरही उपचार सुरु होते. गेल्या २४ तासात पुण्यात ७२ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ११३९ इतकी झाली आहे.

ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या तीन जणांचा मात्र मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांमधील एका महिलेचं वय ६४ असून दुसऱ्या महिलेचं वय ४८ वर्ष आहे. तर पुरुषाचं वय ३८ वर्ष आहे. तिन्ही रुग्णांना इतर व्याधीचांही त्रास होता. ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू रविवारी रात्री ९.३० वाजता झाला. तर इतर दोघांचा मृत्यू सोमवारी झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

रविवारी राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. १९ पैकी १२ मृत्यू मुंबईत, पुण्यात ३, जळगावात २, सोलापूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ मृत्यू झाला. आत्तापर्यंत ११८८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण होते तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील होते तर २ रुग्ण ४० वर्षांखालील होते.

दरम्यान कोरोनाने मुंबईत बऱ्याचं जणांना विळख्यात घेतले आहे. आतापर्यंत मुंबईत ५ हजार ४०७ जण हे कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या दोन दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी येणारे पुढचे काही दिवस अधूक जोखमीचे असणार आहेत. त्यात आता केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमने मुंबईबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. जर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर शहरात १५ मे पर्यंत ७५ हजार कोरोना रुग्ण आढळतील असे भाकीत असेसमेंट टीमने केले आहे.