पुणे शहरात आख्खी भवानीपेठ कोरोनाग्रस्त का झाली

0
482

पुणे, दि. १२ (पीसीबी) : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 3008 वर पोहोचली आहे. पुणे शहरातील भवानी पेठमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. भवानी पेठेत कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर गेला आहे. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण भवानी पेठ कोरोनाग्रस्त कशी झाली याबाबत प्रशानाला जाब विचारण्यात येतो आहे.

पुणे शहरातील भवानी पेठनंतर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ढोले पाटील विभागात 406 कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयापैकी फक्त 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात 1800 इतके रुग्ण आढळले आहेत. यात भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, येरवडा-धानोरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील एकूण 46 प्रभागापैकी 8 प्रभागात 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. पुण्यातील 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने रेड झोन घोषित करण्यात आले आहे. रेड झोन परिसरातील रुग्णसंख्या कमी करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3008 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 161 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासात पुणे जिल्ह्यात 39 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात आणखी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवडमधील रुग्णांची संख्या अगदी नियंत्रणात राहिली आहे. या शहरात १६८ रुग्ण आणि मृतांचा आकडा नऊ पर्यंत गेला आहे. पिंपरी चिंचवडमधील प्रशासनाने कठोरपणे सोशल डिस्टन्सिंग राबविले.