पुणे-मुंबई रेल्वेमार्ग पूर्ववत; सणासुदीच्या काळात नागरिकांचे हाल

0
678

लोणावळा, दि. २६ (पीसीबी) – खंडाळ्याजवळील पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री (दि.२) दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. मध्यरात्री १२ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास अप लाईनवरील दरड हटवण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक खुली करण्यात आली आहे.

दरड कोसळल्याने शनिवारी रात्री अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागला होता. पण आता दरड हटवल्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ऐन रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पहायला मिळाली.