पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर मारहाण प्रकरणी सत्र न्यायालयाने नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा जामीन फेटाळला

0
427

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावला.

बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी धंगेकर यांनी निंबाळकर यांच्या दिशेने चप्पल फेकुन मारली होती. तर एका कार्यकर्त्यांने निंबाळकर यांना किरकोळ मारहाण केली होती.

त्यानंतर निंबाळकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून धंगेकर, शिंदे यांच्यासह १७ जणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन प्राप्त केला. त्यानंतर धंगेकर यांनीही जामिन अर्ज केला, मात्र  संबंधित घटनेमागे धंगेकर हेच असल्याचा युक्तीवाद पोलिसांनी केल्याने न्यायालयाने धंगेकर यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला.