पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी

0
979

पुणे, दि. ४ (पीसीबी) – संततधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याने पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा,  महाविद्यालयांना सोमवारी ( दि. ५ ) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  याबाबतचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (रविवार) दिले.   

पुणे शहरासह जिल्ह्यात  दोन दिवसांपासून  पावसाची संततधार सुरू आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टी  होण्याची शक्यता हवामान विभागाने  वर्तवली आहे.  शिवाय या कालावधीत गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर राहणार असल्याचे  हवामान विभागाने म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे  नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर  प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांना  सुटी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी  यांनी घेतला आहे.