पीएमपीएल बस प्रवासादरम्यान महिलेसोबत जे घडलं त्याचा तिने विचार सुद्धा केला नव्हता

0
436

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – धायरी ते भोसरी या मार्गावरून पीएमपीएल बसने प्रवास करत असताना एका प्रवासी महिलेची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी पावणे नऊ ते साडे दहा वाजताच्या कालावधीत घडली.

याबाबत प्रवासी महिलेने मंगळवारी (दि. 6) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता धायरी गाव ते भोसरी या मार्गावरून पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या उजव्या हातातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली कट करून चोरून नेली. हा प्रकार सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.