पिंपळे सौदागरला पावसाळी गटार नव्याने करणार; शत्रृघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश

0
359

पिंपळे सौदागर, दि. २६ (पीसीबी) – आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सूचनेनुसार नगरसेवक शत्रुघ्न(बापु)काटे यांनी काही दिवसांपासून शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिंपळे सौदागर मधील पावसाच्या पाण्याने साचलेल्या अनेक सोसायट्या, BRTS रोड, पि.के. चौक आणि झिंजुर्डे मळा येथे पाहणी केली. स्ट्रॉम वॉटर लाइन मधुन पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नव्याने स्ट्रॉम वॉटर लाइनच्या कामाची त्वरीत अंमलबजावणी करून भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अशी अडचण पुन्हा निर्माण न व्हावी याची काळजी घेत योग्य त्या सुचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.

यावेळी शहर अभियंता राजन पाटिल साहेब, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवाअण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता स्मार्ट सिटी मनोज सेठीया, कोल्हे साहेब,BRTS विभागाचे काशिद साहेब कार्यकारी अभियंता नरेश जाधव, व अभिजित धाडे इतर कर्मचारी उपस्थित होते.