ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयामुळे भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी

0
583

लंडन, दि. १० (पीसीबी) – विश्व चषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  सामन्यांत  टीम इंडियाने ३६  धावांनी  विजय मिळवला.  ३५३  अशा आव्हानात्मक धावांचा  पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ  ५०  षटकांत  ३१६ धावांवर गुंडाळला.

या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सातव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.  दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यामुळे खात्यात ४ पॉईंट्स आहेत. तर ३  सामन्यांमधील ३ विजयांमुळे न्यूझीलंडची टीम ६ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. ३  सामन्यांमधील २ विजयांमुळे इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा टीम इंडियापेक्षा चांगला असल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ३ सामन्यांमधील २ विजय आणि १ पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया ४ पॉईंट्स मिळवून चौथ्या क्रमांकावर आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तानच्या खात्यात प्रत्येकी ३-३ पॉईंट्स असल्यामुळे ते अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशने १ सामना जिंकल्यामुळे ते सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. या दोन्ही टीम नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.