पिंपरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; ८.३३ टक्के बोनस आणि १५ हजार अनुदान मिळणार

0
514

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस आणि १५ हजार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने आयुक्त हर्डीकर यांच्यासोबत चर्चा करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे ८.३३ टक्के बोनस आणि १५ हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. यावेळी महापालिकेचे मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, कामगार कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, कार्याध्यक्ष मनोज माछरे, महाद्रंग वाघेरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, विशाल भुजबळ, सुनिल विटकर आदी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी महासंघाच्या मागणीप्रमाणे बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेत परिपत्रक जारी केले आहे.