पिंपरी चिंचवड मध्ये रविवारी अर्ध मॅरेथॉनचे आयोजन

0
221

–  शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती फाऊंडेशनचा उपक्रम

पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्ते सुरक्षा’ असे ब्रिदवाक्य घेऊन रस्ते सुरक्षाविषयी आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती फाऊंडेशन यांच्या सहकार्याने किशान स्पोर्टस इंडिया प्रा. लि. यांनी रविवारी (दि. 5 डिसेंबर) अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

रविवारी पहाटे पाच वाजता पिंपळे सौदागर येथिल कुणाल आयकॉन रस्तावरील सार्वजनिक पटांगण येथे स्पर्धेस सुरुवात आणि समारोप होणार आहे. 21 कि. मी. स्पर्धेचा मार्ग – कुणाल आयकॉन रोड – शिवार चौक – कोकणे चौक – गोविंद चौक – स्वराज गार्डन – नाशिक फाटा – उड्डाणपूल उतरुन पुन्हा यु टर्न मारुन पुन्हा त्याच मार्गाने कुणाल आयकॉन रोड येथिल सार्वजनिक पटांगण आणि पुन्हा त्याच मार्गाने दुसरी फेरी पुर्ण करणे असा 21 कि. मी. चा मार्ग आहे. तर 10 कि.मी. चा मार्ग वरील प्रमाणेच एक फेरी पुर्ण करणे असा आहे. 5 कि.मी. चा मार्ग कुणाल आयकॉन रोड – शिवार चौक – कोकणे चौक – कुणाल आयकॉन रस्तावरील सार्वजनिक पटांगण असा आहे.

उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते आणि आमदार लक्ष्मण जगताप, 29 वेळा ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळविणारे ज्येष्ठ क्रिडापटू डॉ. कौस्तुभ राडकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सहभागी होण्यासाठी बुधवारी 1 डिसेंबरपर्यत https://www.townscript.com/e/pimpri-chinchwad-half-marathon-2021 या वेबसाईटवर किंवा साहिल – 9067474360., सुखदेव – 7083767772. या फोन क्रमांकावर नोंदणी करावी. पाच, दहा आणि एकवीस कि. मी.च्या या मॅरेथॉन स्पर्धेत स्त्री, पुरुष अशा दोन्ही विजेत्यांना स्वतंत्र बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 40 वर्षांहून जास्त वयातील स्त्री, पुरुष विजेत्यांना स्वतंत्र बक्षिस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना पदक, टी शर्ट, अल्पोहार, प्रमाणपत्र, गुडी बॅग व फोटो देण्यात येणार आहे. शंतनू प्रभूणे, सुखदेव सिंग ठाकूर आणि किरण काकुलते यांनी संयोजनात सहभाग घेतला होता अशीही माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.